रत्नागिरी : कोकणात सध्या शिमगोत्सवाचा फिवर चढलेला पाहायला मिळत आहे. रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी मंदिरात दरवर्षी फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगतो. वर्षातून केवळ एकदाच रंगणारा डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या उत्सवाची झलक पाहण्यासाठी हजारो भाविक या पालखी भेटीच्या क्षणाचा आनंद लुटतात.
ढोल ताशांच्या गजरात मंदिराचा परिसर दणाणून सोडणाऱ्या या सोहळ्याची रंगत अंगावर नक्कीच काटा आणतो. पालखी भेटीच्या या डोळे दिपवणाऱ्या सोहळ्याने रत्नागिरी शहरातील शिमगोत्सवाची सुरवात होते. बारा वाड्यांचा राजा श्री देव भैरीबुवा मंदिरात ऐटबाज पालखीत रुपं लावून बसवला जातो.
आणि त्यानंतर मध्यरात्री बाराच्या ठोक्याला रंगतो तो दोन देवांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा. सडामिर्या आणि जाकिमिऱ्या येथील श्री देवी नवलाई पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्या भैरी देवाच्या भेटीला येतात. देवळाच्या प्रांगणात या दोन पालख्या भेटीचा सोहळा रंगतो.
महत्वाच्या बातम्या –