आतिषबाजी करताना या नियमांचं पालन नाही केलं तर होणार कारवाई

fireworks-factory-india

पुणे:दिवाळीमध्ये फटक्याच्या दुकानांना आग लागण्याच्या घटना दरवर्षी घडतात यामुळे मोठ्याप्रमाणावर वित्तहानी तसेच जीवितहानी देखील होण्याचा धोका असतो या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने उपविभागीय दंडाधिकारी दौंड -पुरंदर यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33 (1) (ओ) (यु ) अन्वये, शोभेच्या दारू आणि फटाके साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात धूम्रपान करू नये. कोणत्याही प्रकारचे फटाके अथवा शोभेच्या दारूचे रॅकेट परीक्षणासाठी उडवू नयेत असे आदेश दिले आहेत.

दिवाळीमध्ये मोठ्याप्रमाणावर आतिषबाजी करण्यात येते मात्र बऱ्याच वेळा उत्साहाच्याभरात किंवा अजाणतेपणी आग लागण्यासाठी आपणच कारणीभूत ठरण्याची शक्यता असते.मात्र आपला निष्काळजीपणा आता महागात पडू शकतो. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने उपविभागीय दंडाधिकारी दौंड -पुरंदर यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33 (1) (ओ) (यु ) अन्वये, शोभेच्या दारू आणि फटाके साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात धूम्रपान करू नये. कोणत्याही प्रकारचे फटाके अथवा शोभेच्या दारूचे रॅकेट परीक्षणासाठी उडवू नयेत असे आदेश दिले आहेत. हा आदेश 22 ऑक्टोबर 2017 पर्यंत लागू राहील. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 131 नुसार शिक्षेस पात्र राहील.