fbpx

पूल दुर्घटनेची जबादारी कोणाची आज संध्याकाळपर्यंत ठरवा , मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना सुनावलं

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण गंभीर जखमी झाले माहिती आहे. घटनेतील जखमींवर जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सीएसएमटी पूल दुर्घटनेतील जखमींची सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणीही केली. घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईलच, मात्र आज संध्याकाळपर्यंत पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कुणाची आहे, हे निश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं असूनही अशा घटना होत आहेत, हे दुर्दैवी आहे. यासंदर्भात चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही अशा घटना होत असल्याने ऑडिटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.