बारावी निकालाचे ९९ टक्के काम पूर्ण, लवकरच लावणार औरंगाबाद विभागाचा निकाल!

औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा पहिल्यांदाच दहावी पाठोपाठ बारावीची देखील परीक्षा रद्द करण्यात आली आहे. दहावीचा निकाल मूल्यांकन पद्धतीने नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. त्यापाठोपाठ आता बारावीच्या निकालाची देखील प्रतीक्षा लागली आहे. बोर्डाकडून बारावी निकालाची तयारी सुरु असून ९९ टक्के काम बारावी निकालाचे ९९ टक्के काम पूर्ण, लवकरच लागणार निकाल! पूर्ण झाले आहे. येत्या तीन दिवसात निकाल लागण्याची शक्यता बोर्डातील सूत्रांकडून मिळाली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा यंदा मूल्यांकनावर आधारित निकाल लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे मागील वर्षीपासून शैक्षणिक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यातच दहावीचा निकाल देखील परीक्षा न घेता मूल्यांकन करून जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता आयटीआय, अकरावी, पॉलिटेक्निकसह आदी व्यवसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच आता बारावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

निकाल कधी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पुढील अभ्यासक्रम प्रवेशाचे काय? असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यावर्षी बारावी निकाल लावण्यासाठी आधीच विलंब झाला आहे. त्यात आता आणखी किती दिवस बारावी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार? असा देखील प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. बारावी निकालाची तयारी सध्या सुरू आहे. बोर्डाकडून निकाल तयार होताच राज्यमंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यमंडळाकडून निर्णय घेण्यात येईल. राज्यमंडळाकडून निकालाची तारीख देखील जाहीर केली जाणार असल्याचे बोर्डाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या