धक्कादायक! निजामुद्दीनमध्ये गेलेल्यांपैकी ‘या’ राज्यातील ९७ जण कोरोना पोझीटीव्ह

लखनऊ : देशात पुर्णपणे लॉकडाऊन असून सुद्धा निजामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यक्रमाला हजारो लोकांनी हजेरी लावल्याने यंत्रणेविषयी शंका निर्माण झाली होती. या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यापैकी शेकडो नागरिकांना हलगर्जी व नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनाचे संक्रमनामुळे बाधा झाली आहे.

प्रत्येक राज्यातील यंत्रणा या कार्यक्रमाला उपस्थित राहीलेल्याना शोधुन कोरन्टीन करण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्रातील देखील विविध जिल्ह्यातल्या लोक सहभागी झाले होते, त्यांना शोधण्याचे अवघड काम समोर असतानाच उत्तर प्रदेश मधील ९७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे सर्व लोक मरकज मध्ये जाऊन आले आहेत. यासोबतच ६७ देशातील २००० हुन अधिक नागरिक उपस्थित तर होतेच सोबतच यात ९ चिनी नागरिक देखील आले होते. त्यामुळे देशासमोर एवढा गंभीर प्रश्न निर्माण असताना देखील हा कार्यक्रम झालाच कसा? अधिकृत उपस्थित आकडा किती यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

एकाच राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र लागण झालेली हि पहिलीच घटना असून, अजून हजारो नागरिकांना नजरेखाली ठेवण्याचे काम चालू आहे. ज्या देशातुन या रोगाची उत्पत्ती झाली तेथील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि याची प्रसार होते हे अगदी चुक असून आता प्रत्येक उपस्थितांना ट्रॅक करण्याचे मोठे आवाहन आहे. किरगिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, थायलंड सह अनेक देशातील नागरिक देखील या तबलिंगी मध्ये समावेश होते.