जालना : जिल्ह्यात रविवारी ९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचारनंतर चौघांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जालन्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
रविवारी जिल्ह्यात आढळलेले रुग्ण
रविवारी जिल्ह्यात नवीन आढळलेल्या रुग्णांपैकी जालना ४५, घनसावंगी तालुक्यातील पाणेवाडी १, तीर्थपुरी १, अंबड २, पराडा १, बदनापूर तालुक्यातील दाभाडी १, जाफराबाद १, सावरखेडा २, खामखेडा १, सावरगाव म्हस्के १, टेंभुर्णी २, भोकरदन ३, चांदई ठोंबरी २, जयदेववाडी ३१ तसेच बुलडाणा २ अशाप्रकारे आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६४ तर अँटिजेनमधून ३२ असे मिळून ९६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.
ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब
जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ५२८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १३ हजार ६६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर उपचारादरम्यान ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्या ४७५ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब सुरू केला आहे. यातही टेस्टिंग अर्थात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात आरटीपीसीआरद्वारे ३७६ नमुन्यांची तपासणी केली, यापैकी ६४ अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ६८१ नमुन्यांची अँटिजेन तपासणी केली, त्यापैकी ३२ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्हिटीचा दैनंदिन दर ९.०८ टक्के तर एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ११.२४ टक्के एवढा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं’
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा
- महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं; तृप्ती देसाईंच आव्हान !
- पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच आल्या पावली परत फिरल्या तृप्ती देसाई
- ‘जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत नाही, ना मदत, ना दिलासा’