औरंगाबादेत एमआयएमची 93 जागांवर मुसंडी, दोन ग्रामपंचायती ताब्यात

औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीत एमआयएम पक्षाने चांगलीच मुसंडी मारलीय. सोमवारी लागलेल्या निकालात औरंगाबाद जिल्ह्यात ९३ पेक्षा जास्त जागी एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. नायगाव भिकापूर आणि रावरसपूरा या दोन ग्रामपंचायतीमध्ये एमआयएमने एकहाती सत्ता संपादीत केलीय. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमने ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा राजकीय वर्चस्व सिद्ध केलय.

महाराष्ट्रातील एमआयएमला पहिला आमदार आणि पहिला खासदार देणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातच आता अनेक ग्रामपंचायतींवर एमआयएमचे वर्चस्व राहणार आहे. ग्रामपंचाय निवडणुकीच्या आधीच १०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा एमआयएमच्या वतीनं करण्यात आला होता. त्यानुसारच एमआयएमच्या उमेदवारांनी कामगिरी केली आहे. यात नायगाव भिकापूर ग्रामपंचायतीमध्ये १२ पैकी ९ जागी तर रावरसपुरा ग्रामपंचायतीत ९ पैकी ५ जागी एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत.

इतरही काही ग्रामपंचायतीमध्ये एमआयएमचा सरपंच करण्यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न केले जात आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या दृष्ट्रीने हा विजय पक्षाचे मनोबळ वाढवणारा ठरेल. खासदारांसह पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, महिला प्रदेशाध्यक्ष अॅड. आस्मा शेख, निवडणूक प्रमुख शेख अहेमद, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांनी निवडणूक प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे एमआयएमला हा विजय मिळवता आला.

महत्वाच्या बातम्या