टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये आज वायुसेना दिवस ( Indian Air Force Day) साजरा केला जात आहे. आज भारतीय हवाई दलाचा 90 वा स्थापना दिवस आहे. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आणि प्रत्येक हवाई दलातल्या सैनिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. आजचा दिवस भारत मातेच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राण्यांची आहुती देणाऱ्या हवाई दलाच्या जवानांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. त्याचबरोबर आजचा दिवस तरुणांना भारतीय दलामध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करतो.
वायुसेना दिवसाचे महत्त्व
वास्तविक, भारतीय हवाई दलाची स्थापना 08 ऑक्टोबर 1932 साली झाली , म्हणूनच दरवर्षी 8 ऑक्टोबरला वायुसेना दिवस साजरा केला जातो. भारतीय वायुसेनेच्या स्थापनेच्या वेळी वायुसेनेमध्ये 6 RPF प्रशिक्षित अधिकारी आणि 19 सैनिक सामील होते. त्याचबरोबर, 4 वेस्टलँड IIA बायप्लेन्स देखील होते. यावेळी भारतीय वायुसेनेची ताकद जगभरातील वायुसेनेच्या तुलनेत काहीच नव्हती. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय वायुसेनेमध्ये ताकतीमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली.
आजचा दिवस देशभरातील विविध वायू सेनेच्या विमानतळांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्व हवाई दले आपापल्या विमानतळावर भव्य परेडचे आयोजन करतात. त्याचबरोबर वर्षभरात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या वायुसेनिकांना सन्मान आणि पदके दिली जातात.
भारतीय हवाई दलाचा इतिहास
स्वातंत्र्यपूर्वी वायुसेनेला रॉयल इंडियन एअर फोर्स (RIAF) म्हटले जात होते. वायुसेनेत 6IF प्रशिक्षित अधिकारी आणि 19 वायुसैनिकांची मिळून पहिली हवाई तुकडी तयार करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर रॉयल इंडियन एअर फोर्स या नावातून रॉयल शब्द काढून भारतीय हवाई दलाचे नाव ‘इंडियन एअर फोर्स’ करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात भारतीय वायुसेनेने खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
स्वातंत्र्यपूर्वी वायुसेना फक्त लष्कराच्या मदतीसाठी होती. वायुसेनेचे कोणतेही स्वातंत्र्य युनिट त्यावेळी नव्हते. वायुसेनेचे पाहिले स्वातंत्र युनिट बनवण्याचे श्रेय वायुसेनेचे पहिले कमांडर इन चीफ एअर मार्शल सर थॉमस डब्ल्यू एल्महर्स्ट यांना जाते. सर थॉमस डब्ल्यू एल्महर्स्ट भारतीय वायुसेनेचे पहिले प्रमुख एअर मार्शल होते. 15 ऑगस्ट 1947 ते 22 फेब्रुवारी 1950 पर्यंत ते या पदावर होते.
भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य
भारतीय वायुसेनेच्या ब्रीदवाक्य हे भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातून घेतले गेलेले आहे. ‘नभ स्पृश दीपतम’ हे भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य आहे. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिलेल्या उपदेशाचा हा एक उतारा आहे.
भारतीय हवाई दलाचा ध्वज
भारतीय वायुसेनेचा ध्वज 1951 मध्ये स्वीकारण्यात आलेला आहे. वायुसेनेच्या ध्वजामध्ये निळा भगवा पांढरा आणि हिरवा या रंगांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- Mohan Bhagwat | ‘वर्ण आणि जातीव्यवस्थेचा त्याग केला पाहिजे’ म्हणत मोहन भागवत यांनी केलं मोठं वक्तव्य
- Nana Patole | नाशिकचा अपघात खड्ड्यांमुळेच ; नाना पटोले यांचा आरोप
- NANA PATOLE । “तुम्हाला जन्मदात्त्यांबद्दल अभिमान नाही, ही कुठली संस्कृती?”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंचा सवाल
- Whatapp Update | आता Whatapp मध्ये बघता येईल ट्रेन अपडेट
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात काळ्या पैश्यांचा पाऊस? हायकोर्टात मनी लाँड्रींगची याचिका दाखल; ईडी करणार का चौकशी?