अण्णांच्या ९० टक्के मागण्या पूर्ण : महाजन

टीम महाराष्ट्र देशा- विविध मागण्यांसाठी आजपासून सुरु होणारे अण्णा हजारे यांचे नियोजित उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं आहे. आज जलसंपदामंत्री गिरीष महाजन हे सकाळी आठ वाजताच राळेगण सिध्दीमध्ये दाखल झाले होते. अखेर दोन तासांच्या चर्चेंनंतर अखेर अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित करण्याच्या निर्णय घेतला.

अण्णा हजारे यांनी ठेवलेल्या ९० टक्के मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडून पूर्ण झाल्या असून अण्णांनाही याची माहिती देण्यात आली आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. आज (मंगळवार) अण्णा हजारेंच्या नियोजित उपोषणाला राळेगणसिद्धी येथे सुरुवात झाली. या ठिकाणी महाजन यांनी अण्णांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची बाजू मांडली.