fbpx

९ वर्षीय मुलाने केला ३६ वर्षीय महिलेवर बलात्काराचा आरोप, केरळातील धक्कदायक घटना

टीम महाराष्ट्र देशा: केरळमधील ९ वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेवर बलात्काराचा आरोप केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार केरळमधील थेन्हीप्पलम पोलिस ठाण्यामध्ये या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील एका वर्षापासून संबंधित महिला अल्पवयीन मुलावर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

पिडीत अल्पवयीन मुलाने हि सर्व घटना स्थानिक दवाखान्यातील डॉक्टरकडे सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. डॉक्टरने बाल चाईल्ड हेल्पलाईन यंत्रणेला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलेली महिला हि पीडिताच्या शेजारी राहते. दरम्यान, संबंधित महिला आणि पीडित मुलगा आणि आरोपीच्या कुटुंबामध्ये आधी देखील वाद असल्याचं सांगितले आहे.