हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ८ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. हिंगोलीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ९१६ वर पोहोचली आहे. यापैकी ३ हजार ७५२ रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. तर जिल्ह्यात आतापर्यंत ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हिंगोली शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी पालिकेसोबतच पोलिसांच्या पथकाने केलेल्या दंडात्मक कारवाईमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. .शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या पथकाने तसेच पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली.
हिंगोली शहरातील शास्त्रीनगर भागात कोरोना रुग्ण आढळल्यामुळे हा भाग कंटोनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या ठिकाणी नगरपालिका प्रशासन अधिकारी रामदास पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे, कर्मचारी बाळू बांगर यांच्यासह पथकाने भेट दिली. याशिवाय आरोग्य विभागाच्या पथकाने परिसरातील नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
दरम्यान, जिंतूर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयातील एका लग्नसमारंभात ५० पेक्षा जास्त लोक असल्याचे आढळल्याने पालिका प्रशासनाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी लग्नसमारंभासह गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही गर्दी झाली, त्यामुळे प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घेण्याचे आवाहन
- जाळीचा देव येथील सरपंचपद निवडीची प्रक्रिया तूर्तास स्थगित; वाढत्या कोरोना रुग्णसंख्यमुळे प्रशासनाचा निर्णय
- सरकारने आरक्षणाविषयी भक्कमपणे कोर्टात बाजू मांडावी; खा. संभाजीराजेंचे साष्टपिंपळगावात प्रतिपादन
- परभणीतून अमरावतीला जाणाऱ्या बस बंद; जिल्ह्यात सोमवारी २२ नव्या रुग्णांची भर
- जालन्यात कोरोनाचे १३७ नवे रुग्ण, नियम मोडणाऱ्यांविरुद्ध पालिकेची कारवाई