fbpx

PHOTO : पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील एसटी च्या अपघाताची घटना ताजी असताना, पुण्यातीलच नारायणगावजवळ एसटी आणि टेम्पोचा अपघात झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर आळेफाटाजवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

असा घडला अपघात 
शिवाजीनगर आगारातील ञ्यंबकेश्वर-पुणे ही बस पुण्याकडे जाण्यासाठी निघाली होती. रात्री दीडच्या सुमारास ही बस पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ पोहोचली.रस्त्याच्या कडेला कांद्याच्या गोणीने भरलेला टेम्पो थांबला होता. टेम्पोचा टायर पंक्चर झाला होता आणि चालक टायर बदलण्याचे काम करत होता. भरधाव एसटीच्या चालकाला या टेम्पोचा अंदाज आला नाही आणि एसटीने टेम्पोला धडक दिली. या भीषण अपघातात आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका प्रवाशाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात १३ जण गंभीर जखमी आहेत. रात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला.

मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे
शोभा नंदू पगार (वय-४५) मु- उतराने, बागलाल सटाणा.
यमुना बिला पगार, (वय ५५), सटाणा
संकेत दत्तात्रय मिस्त्री, गणेशचौक, सिडको नाशिक
विकास चंद्रकांत गुजराथी (वय ५०) गंगावेश, सिन्नर
सागर कृष्णलाल चौधरी (वय ३०)
अभिशेक जोशी
कैलाश विठ्ठल वायकर
किशोर यशवंत जोंधळे (वय ४०), कोकणगाव संगमनेर, टेम्पो क्लीनर
जाकीर गुलाब पठाण ( वय ३०), टेम्पो चालक

जखमी प्रवाशांची नावे

भोसले हॉस्पिटल
नंदू सीताराम पगार (वय ५८)
संतोष जयसिंग गुलदगड (वय ३२)
दीपक चंद्रकांत लांडगे (वय ३१)
संतू तुळशीराम बावसार (वय ५२)
तुकाराम जंग्या पावरा (वय ५६)
सूर्यकांत धोंडीराम घाडगे (वय ५७)

नारायणगाव ग्रामीण हॉस्पिटल
गणेश एकनाथ घोंगडे (वय २५), भोसरी, उपचार करून सोडले
रमेश रामदास शेळके (वय ४४)
ज्ञानेश्वर रमेश शेळके

धांडे हॉस्पिटल
अरुण लक्ष्मण शिंदे (वय २३)
सुधीर बागवाने (वय ४९)
तुषार दशरथ करळे (वय २९)
प्रवीण गमसेवक दुबे (वय ३८)

पहा या भीषण अपघाताचे फोटो