मुंबईचे रस्ते खड्यात घालणाऱ्या ९६ अभियंत्यांवर कारवाई

mumbai rode11

मुंबई : मुंबई रस्ते घोटाळ्याचा शंभरपैकी ९६ अभियंत्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. १०० पैकी फक्त चारच अभियंते निर्दोष आढळले आहेत असून तब्बल ९६ अभियंत्यांनी मुंबईच्या रस्त्यांना खड्ड्यात घातल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील उर्वरित २०० रस्त्यांच्या कामातील त्रुटीची जबाबदारी निश्चित करण्याच कामही प्रगतीपथावर असून त्याचाही अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे. मुंबईतील ३४ रस्त्यांचा अहवाल आज आयुक्त आणि महापौरांना सादर करण्यात आला.

Loading...

२०१५ मध्ये रस्ते घोटाळ्याचा एकूण ३०५ कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला होता. प्रथम चौकशीत रस्ते विभागातील कनिष्ठ अभियंत्यांपासून उप मुख्य अभियंत्यांपर्यंत शंभर जणांवर ठपका ठेवला होता. आता दुसऱ्या चौकशीत २०० रस्त्यांचा पाया बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी १९१ अभियंत्यांना जबाबदारी सोपवण्यात आली होती मात्र अभियंत्यांनी त्यांना नेमून दिलेले काम केले नाही. अस चौकशीत स्पष्ट झाले आहे. उपायुक्त रमेश बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल गेल्या आठवड्यात आयुक्तांना सादर केला. त्यानुसार आयुक्तांनी प्रत्येक अभियंत्याच्या या घोटाळ्यातील भूमिकेनुसार कारवाई सुनावली आहे.Loading…


Loading…

Loading...