तीन महिन्यात ८७ हजार रोजगारांवर कुऱ्हाड ; सर्वाधिक फटका कंत्राटी व हंगामी कर्मचाऱ्यांना

टीम महाराष्ट्र देशा: चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये कारखानदारीच्या क्षेत्रात नियमित कामगारांची संख्या ३९ हजारांनी वाढली असली, तरी ५४ हजार कंत्राटी, तर ७२ हजार हंगामी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड पडली आहे. रोजगार गमावलेल्या ८७ हजार कर्मचाऱ्यांमध्ये ६५ पुरुष, तर २२ हजार महिला आहेत. केंद्रीय कामगार मंत्रालयाच्याच कामगार ब्युरोच्या ‘तिमाही रोजगार सर्वेक्षणा’त ही बाब उघड झाली आहे.

आठ निवडक क्षेत्रांचा विचार करता एकूण ६४ हजार नोकऱ्यांची वाढ झाली आहे. या आठपैकी सहा क्षेत्रांमधील नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. तर कारखानदारी क्षेत्रात ८७ हजार नोकऱ्यांची, तर वाहतूक क्षेत्रात ३० हजार नोकऱ्यांवर कुऱ्हाड पडली आहे. दरम्यान यामध्ये सर्वाधिक फटका कंत्राटी व हंगामी कर्मचाऱ्यांना बसला आहे.

 

You might also like
Comments
Loading...