fbpx

पॅरिसमधील ८५० वर्षीय जुने चर्च आगीत भस्मसात !

टीम महाराष्ट्र देशा : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ८५० वर्षीय जुने ऐतिहासिक ‘नोत्र दाम कॅथेड्रल’ नावाचे चर्च लागलेल्या भीषण आगीत भस्मसात झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चर्चमध्ये नूतनीकरणाचं काम सुरू होतं, आणि यामुळेच आग लागलेली असू शकते अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

 

चर्चला लागलेली भीषण आग

 

आगीत भस्मसात झालेले चर्च

 

अगीपुर्वीचे सुंदर चर्च

 

‘नोत्र दाम कॅथेड्रल’ चे महत्व

८५० वर्षीय जुने ऐतिहासिक ‘नोत्र दाम कॅथेड्रल हे चर्च आहे. 1163 ते 1345 या दरम्यान याची स्थापना करण्यात आली होती. पॅरिसमधील सर्वात लोकप्रिय स्थळांपैकी एक होते. प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येनं लोक इथं प्रार्थनेसाठी आणि पर्यटनासाठी येत. आणि ते युरोपीय संस्कृतीचे प्रतिक म्हणून ओळखले जात होते. जगातल्या सर्वात प्राचीन कॅथेड्रलपैकी एक ‘नोत्र दाम कॅथेड्रलला’ लागलेल्या भीषण आगीमुळे त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवानं मुख्य इमारत आणि दोन टॉवर्स वाचवण्यात अग्नीशमनल दल आणि पोलिसांना यश आलं आहे. मात्र आगीमुळे प्रार्थनास्थळाचा हॉल आणि कळस कोसळला आहे.

व्हिडीओ