मळ डबल ! ८५ टक्के रिक्षाचालक करतात तंबाखूचे सेवन

मुंबई : तंबाखू आणि सिगारेटमुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे हे वारंवार सांगितले जात आहे. सरकार विविध प्रकारे जनजागृती करताना दिसत असले तरीही मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या ते अद्याप पचनी पडलेले दिसत नाही. मुंबईतील ८५ टक्के रिक्षाचालक हे तंबाखूचे व्यसन असल्याचे भयान वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे या ८५ टक्के रिक्षा चालकांपैकी ४५ टक्के रिक्षाचालकांमध्ये कॅन्सरची लक्षणे दिसून आली आहेत.

कॅन्सर पेशंटस् एड असोसिशएनने केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. शहर उपनगरांतील अनेक परिसरांत तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यात कुर्ला, सांताक्रुझ, बोरीवली, गोरेगाव आणि मालाड अशा विविध परिसरांचा समावेश आहे. या शिबिरांमध्ये कान, नाक, घसा आणि दातांचे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. रिक्षाचालकांना तंबाखू सेवनाची जी सवय लागते, ती अनेक कारणांमुळे लागल्याचे आढळून आले.

व्यावसायिक ताणतणाव, भूक मारली जाणे, व्यसने, प्रदूषणाचा त्रास आणि आपल्या कुटुंबापासून आलेले दुरावलेपण या कारणांमुळे तंबाखू सेवनाची सवय रिक्षाचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते, असे निरीक्षण सर्वेक्षणाअंती नोंदविण्यात आले आहे.