राज्यात ८१७०३८ लस शिल्लक; भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा दावा

मुंबई : राज्यात लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये लसीकरण बंद पडले आहेत. अनेक केंद्रावर लस उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये केवळ दुसरा डोस देण्यात येत आहे. असे असताना राज्यात लसीचा साठा शिल्लक असल्याचा दावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर दावा केलाय. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राला मिळालेला लसीकरणाचा साठा १७२६२४७० असून राज्याने ५ मे २०२१ रोजी सकाळपर्यंत १६४४५४३२ लसीकरण केले आहे. तर राज्यात ८१७०३८ लसींचा साठा शिल्लक असल्याचा दावा केलाय.

यामध्ये केशव उपाध्ये यांनी कोणतीही टीका केली नसली तरी त्यांचा रोख हा लसीकरणाच्या नियोजनाकडे होता. राज्यात लसीकरण सुरू झाल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरू आहे. असे असले तरी देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या