fbpx

राजस्थानमधील रूग्णालयात ८१ बालकांचा मृत्यू; चौकशीचे आदेश

जयपूर : राजस्थानमधील बांसवारा येथील महात्मा गांधी रूग्णालयातील सुमारे ८१ बालकांचा मृत्यू झाला. कुपोषणामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. राजस्थान सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले.

या घटनेची वेगळ्या पद्धतीने चौकशी केली जाणार आहे, असे मुख्य वैद्यकीय व आरोग्य विभागाच्या अधिका-याकडून सांगण्यात आले. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातील रूग्णालयात प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना अलीकडेच घडल्या आहेत. गोरखपूरच्या बीआरडी रूग्णालयात प्राणवायू पुरवठ्याअभावी ४१५ बालकांचा मृत्यू झाला.

तर, झारखंडमधील दोन वेगवेगळ्या रूग्णालयात ८०० हून अधिक बालकांचा मृत्यू झाला.