८० वर्षांचा योद्धा शेतकऱ्यांसाठी येणार धावून! मुख्यमंत्री मात्र अजूनही घरात बसून…

sharad pawar and uddhav thakrey

मुंबई : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.

आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून ते दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढतील अशी अपेक्षा केली जात आहे. शरद पवार हे १८ व १९ ऑक्टोबर रोजी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतील. तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा व उस्मानाबादमधील भागांना शरद पवार भेट देतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली. तर, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीच्या संकट निवारणावर मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक घेतली. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यकडे केंद्रातर्फे भरीव आर्थिक मदत मिळावी अशी मागणी देखील फोनद्वारे चर्चा करून केल्याचे समजते.

महाराष्ट्राला केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल – मोदी

उद्धव ठाकरेंनी मोदींशी चर्चा केल्यानंतर मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन देण्यात आलं. “महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं.” असं ट्विट नरेंद्र मोदींच्या अधिकृत अकाऊंट वरून करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-