‘धर्मा’वर ‘अधर्मा’चा विजय

DHARMA PATIL

टीम महाराष्ट्र देशा: मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची अखेर मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. मुंबईतील जेजे रुग्णालयात धर्मा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. त्यासाठी त्यांनी मंत्रालयात हजारोवेळा खेटे घातल्या पण पदरी निराशाच आल्याने अखेर धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन वेळा धर्मा पाटील यांचं डायलिसीस करण्यात आलं होतं.धर्मा पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते, मात्र ते अपयशी ठरले.

आता या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. अशा प्रकारचा संताप राज्यभरातून उमटत आहे. तर धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचं आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली आहे.