मुंबई विद्यापीठावर भगवा,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेना विद्यार्थी संघटनेने भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) चा दारुण पराभव केला. १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत युवासेनेने आतापर्यंत तब्बल ८ जागांवर एकहाती विजय मिळविला असून उर्वरित दोन जागांवरही युवासेनेचेच उमेदवार आघाडीवर आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील पदवीधर गटाच्या निवडणुकीसाठी २४ मार्चरोजी मतदान झाले. या निवडणुकीसाठी एकूण ४० टक्के मतदान झाले. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यापीठाच्या ५३ मतदान केंद्रावर मतदान झाले. अधिसभेवर यापूर्वीही युवा सेनेचेच वर्चस्व होते. मात्र यंदा अभाविपसह एनएसयूआयने देखील युवा सेनेला आव्हान दिले होते. पदवीधर गटातील १० जागांसाठी ६८ उमेदवार रिंगणार होते. या निवडणुकीसाठी ६३ हजार मतदारांनी नोंदणी केली होती.

2010 साली देखील युवासेनेनं ही निवडणूक जिंकली होती. यंदा युवासेनेसमोर अभाविप आणि काँग्रेसप्रणित एनएसयूआयच्या उमेदवारांचं तगडं आव्हान होतं. पण युवासेनेनं जोरदार मुसंडी मारत या निवडणुकीत एक हाती विजय मिळवला.

दरम्यान, 25 मार्चला झालेल्या या निवडणुकीसाठी एकूण 62 हजार पदवीधर मतदारांनी मतदान केलं होतं. यावेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला होता. युवासेनेचा हा विजय आदित्य ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

You might also like
Comments
Loading...