8 नोव्हेंबर रोजी मार्केटयार्डातील संघटना काळा दिवस पाळणार

pune market ward

टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी कुठलीही पूर्वतयारी न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाले. कष्टकर्यांचे, कामगारांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आले तरीही बाजारातील अनेक व्यवहार सुरळीत झाले नाहीत. त्याच्या निषेधार्थ 8 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे, अशी घोषणा ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली. मार्केट मार्केटयार्डातील कार्यरत असणा-या विविध संघटनांच्या वतीने हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा फुले कामगार संघटना, पुणे तोलणार संघटना, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत आणि टेम्पो पंचायत या संघटना सहभागी होणार आहेत.