कर्नाटक निवडणूक – काँग्रेस कार्यकर्त्यांवर अॅसिड हल्ला, 8 जण जखमी

कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आज (सोमवारी) जाहीर झालेल्या निकालाप्रमाणे काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळाल्या आहेत. या विजयामुळे राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तुमकूरमध्ये पक्षाचे नेते इनायतुल्ला खान यांच्या विजयाचा जल्लोष करत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर अॅसिड हल्ला करण्यात आलेला आहे. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील 2664 जागेपैकी 2267 जागेचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. काँग्रेस पक्षाने 846 जागा, भाजपाने 788 आणि जेडीएसने 307 जागेवर विजय मिळविला आहे. तर 277 जागेवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

राज्यातील म्हैसूर, शिवमोगा आणि तुमाकुरू या जिल्ह्यांमधील नगरपालिका, नगरपरिषद आणि नगर पंचायतींसाठी हे मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकांसाठी 67.5 टक्के मतदान झाले आहे.

You might also like
Comments
Loading...