आठ तास झोप घेण्याचा हा आहे फायदा.

वेबटीम-शरीरासाठी नियमित आरामदायी झोप अत्यावश्यक आहे. झोपल्यावर शरीराच्या सर्व क्रिया मंदावतात, अवयवांना आराम मिळतो आणि त्यांची दुरुस्तीदेखील होते. नीट झोप झाली नाही तर चिडचिडेपणा, थकवा, अंगदुखीसारखा त्रास होतो. या स्थितीत व्यक्तींची एकाग्रता, चपळता आणि विचारशक्ती कमी झाल्यामुळे त्यांच्या कामात चुका होतात आणि अपघातही घडू शकतात. सततच्या अनियमित झोपेमुळे मेंदूचे आणि मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमध्ये झोप नीट न झाल्यामुळे चंचलपणा, बुद्धीचा खुरटलेला विकास आणि वागणुकीतले बद्दल जाणवतात

 

आठ तास झोप घेणार्‍या व्यक्ती पहिल्याच भेटीत भेटणार्‍यांचे चेहरे व नावे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतात, असे बोस्टनमधील ब्रिगॅम वुमेन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे. या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींना काही लोकांचे चेहरे व नावे दाखवून ती स्मरणात ठेवण्यास सांगितले गेले. बारा तासांनंतर त्यांची स्मरणशक्तीचा अभ्यास करण्यात आला. यावरून चांगल्या स्मरणशक्तीसाठी आठ तास झोप आवश्यक असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.