घुमा चित्रपटाच्या या ८ गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

महेश रावसाहेब काळे या नवख्या दिग्दर्शकाच्या पहिला आणि बहुप्रतीक्षित ‘घुमा’ चित्रपटात  ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे वास्तव दाखवणारा हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर ला महाराष्ट्र भर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाविषयी अशा काही वेगळ्या गोष्टी आहेत ज्या  तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या अशाच काही वेगळ्या गोष्टी.

१) हा चित्रपट अवघ्या २५ दिवसांत तयार करण्यात आला.

२) सिनेमासाठी गुरु ठाकूर यांनी दोन गाणी लिहिली आहेत. तर संगीत जसराज जोशी, ऋषिकेश दातार आणि सौरभ भालेराव यांनी दिलं आहे.

३) कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली असून, गाणी अजय गोगावले, प्रिया बर्वे आणि मुग्धा हसबनीस यांनी गायली आहे.

४) “ढोलकीच्या तालावर” या प्रसिद्ध मालिकेची विजेती वैशाली जाधव हिने ‘घुमा’ या चित्रपटात एक लावणी सादर केली आहे.

५) चित्रपटाचे छायाचित्रण योगेश कोळी यांनी केले असून संकलन अपूर्वा साठे यांनी केले आहे.

६) चित्रपटातील गाण्यांचा हक्क झी म्युझिक कंपनीने विकत घेतला आहे.

७) चित्रपटातील सर्व कलाकार, दिग्दर्शक व सहाय्यक दिग्दर्शक, कार्यकारी निर्माता व प्रॉडक्शनची टीम सर्वजण नगरचे आहेत.

८) सोळाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात PIFF Best film AUDIENCE CHOICE AWARD घुमाने पटकावले आहे.