भरधाव ट्रक लग्नमंडपात घुसला, ८ जणांचा मृत्यू , ट्रकने विजेचे तीन खांबही पाडले

टीम महाराष्ट्र देशा- भरधाव ट्रक लग्नमंडपात घुसल्याने ८ जण ठार झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून ट्रक चालक फरार झाला आहे. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.

Loading...

बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यात बुधवारी (ता.१०) रात्री एक लग्न होते. लग्नात आलेली वऱ्हाड मंडळी जेवण करीत असताना रस्त्याच्या कडेला असणार्या लग्नमंडपात चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक घुसला. अतिशय वेगात असलेला हा ट्रक अचानक लग्नमंडपात घुसल्याने एकच खळबळ उडाली.

या अपघातात ८ लोकांचा मृत्यू तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचा वेग इतका जोरात होता कि विजेच्या खांबाना जोरदार धडक दिल्याने तीन खांब देखील खाली पडले. या भयानक अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला आहे.Loading…


Loading…

Loading...