सिनेमागृह चालकांना मनसेचा ८ दिवसांचा अल्टीमेट्म

सिनेमागृहात खाद्यपदार्थांचे दर कमी करा, अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करू  

पुणे : पुणे शहरात असणाऱ्या सिनेमागृहात खाद्यपदार्थांसाठी सर्वाधिक दर आकारले जातात,आठ दिवसात हे दर जर कमी करण्यात आले नाहीत तर मनसे स्टाईल ने आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुशिक्षित डॉक्टर, वकील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं आहेत. दरवेळी आमच्यावर दरोडेखोरांचा गुन्हा दाखल केला जातो. आम्ही गुंड आहोत, असे दाखविले जाते. आम्ही जर कानाखाली मारले असेल तर जी तरतूद कायद्यात असेल त्यानुसारच पुणे पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराध्यक्षा अॅड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.
पुण्यात आज मनसेने पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मंडळी. पुण्यातील सिनेमागृह चालकांनी आठ दिवसात खाद्यपदार्थांच्या किमती कमी कराव्यात आणि घरचे खाद्यपदार्थ सिनेमागृहात घेऊन जाण्यास परवानगी द्यावी. सिनेमागृहमालकांनी आठ दिवसात यावर निर्णय न घेतल्यास ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा ठोंबरे यांनी दिला.
You might also like
Comments
Loading...