८ देशांचे राजदूत संभाजीराजेंच्या भेटीला; पूरग्रस्त भागाची केली चौकशी

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. परंतु आता सरकारच्या मदतीमुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ८ देशांच्या राजदूतांनी संभाजीराजेंची भेट घेतली. याविषयी छत्रपती संभाजीराजेंनी एक फेसबुक पोस्ट केली आहे त्यात त्यांनी ‘सांगली महापूराचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. दिल्लीतील माझ्या बंगल्यावर ८ देशांच्या राजदूतांच्या उपस्थितीत बैठक झाली. विशेष म्हणजे पूरपरिस्थितीची माहिती घेण्यासाठी ते स्वतः माझ्या घरी आले. यावेळी जर्मनी, कॅनडा, ब्राझील, पोलंड, बुलगारिया, स्पेन, नॉर्वे, तुनिसिया या देशांचे राजदूत उपस्थित होते. माझे विश्वासू योगेश केदार यांनी पूर्ण परिस्थितीचे चित्रण दाखवले.

Loading...

यावेळी बोलताना मी सांगितलं की, इतका प्रलयकारी महापूर गेल्या शतकभरात तरी पाहायला मिळाला नव्हता. खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचे नुकसान झाले. मी स्वतः लोकांना धीर देण्यासाठी पाण्यात उतरलो. नौदल, हवाईदल आणि लष्कराच्या तुकड्या घेऊन जाण्यात भूमिका निभावली. शेकडो बोटी तिथे पोचवल्या. दुःखाची ही बाब आहे की जवळपास ३० लोकांना जीव गमवावा लागला. पशुधन व शेतीचे झालेले नुकसान तर अगणित आहे.

आज परिस्थिती हळू हळू पूर्व पदावर येत आहे. कोणाही परकीय देशाच्या किंवा राज्याच्या मदतीशिवाय आम्ही या विपरीत परिस्थिती मधून बाहेर येत आहोत. आम्ही स्वतः लढलो आणि जिंकणार सुध्दा ! सर्व समाज यावेळी एकवटला. लोकांचे संसार उभे करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत.

मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, माझ्या दिल्लीतील विकसित झालेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा येणाऱ्या काळात महाराष्ट्राला खूप फायदा होणार आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास व संपूर्ण छत्रपती घराण्याचा इतिहास दुसऱ्या देशांच्या राजदूतांना जाणीवपूर्वक मी सांगत असतो.

मला माझ्या घराण्याच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर गर्व आहे. आणि भविष्यावर विश्वास आहे. यावेळी जर्मनी, पोलंड, बुलगारिया, कॅनडा, स्पेन, ब्राझील, तुनिसिया नॉर्वे या देशांच्या राजदूतांनी यामध्ये आम्ही नक्कीच काहीतरी योगदान देऊ असे आश्वासन दिले अशी माहिती दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू