गोष्ट ७५ वर्षीय आजोबांच्या लग्नाची; हे वाचून तुम्हालाही प्रेमाला वय नसत यावर विश्वास बसेल.

chhattisgarh 75 yr old marriage couple

वेबटीम : प्रेमाला वय जात पंथ अस कोणतही बंधन नसत. तुम्हाला कोणत्याही वयात प्रेम होऊ शकत. एखाद्यावर प्रेम हे ठरवून नाही तर मनातून अचानक होवून जात. परंतु आजकाल समाजात आपण अनेक अशा घटना पाहतो कि ज्यामुळे आपल मन सुन्न होत. अनेक वेळा तरुणांच्या प्रेमाला कुटुंबातून विरोध झाल्याने प्रेमी युगलांनी टोकाचे पाउल उचलल्याच्या घटना आपण पाहतो. मग अशा वेळी एखाद्या ७५ वर्षीय आजोबांनी कोणावर प्रेम केले तर. नक्कीच या आजोबांच्या घरातून त्यांना विरोध झाला असणार हे वाटले असेल ना. पण असा विचार करन तुमची चूक होऊ शकते. कारण छत्तीसगडमध्ये एक अशी घटना घडली आहे कि ज्यामुळे नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
chhattisgarh 75 yr old marriage coupleप्रेम करण्याला कोणतही वय नसत म्हणत छत्तीसगडमधील बागडोल गावात ७५ वर्षीय प्रेमी युगल लग्नाच्या रेशमी बंधनात कैद झाले आहे. झाल अस कि ७५ वर्षीय असणारे रतीया राम यांना गावातीलच ७० वर्षीय जमनाबाई यांच्याशी प्रेम झाले. हे दोन्ही प्रेमीयुगल एकमेकांना भेटण्याआधी बागडोल याच गावात एकट्याने राहत होते. भेट झाल्यांनतर १५ दिवसांतच गाव किंव्हा कुटुंबीय काय म्हणतील याचा विचार न करता दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

chhattisgarh 75 yr old marriage couple

आता ७५ वर्षीय आजोबांना प्रेम झाल म्हणल्यावर आणि तेही गावात लोक तर विचार करणारच. मग काय लगेच पंचायत बसली त्यात पंचायत आणि कुटुंबीयांनी दोघांच्याही लग्नाला होकार दिला. इतकच नाही तर संपूर्ण बागडोल गाव आज्जी-आजोबांच्या लग्नाला हजर होता. हे लग्न १६ ऑगस्टला झाले आहे.