fbpx

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ७३ लाख बालक पोषण आहारापासून वंचित

Anganwadi

मुंबई  : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सात दिवस ७३ लाख बालकांना पोषण आहार न मिळाल्याने अनेक बालके तीव्र कुपोषणाच्या मार्गावर असल्याचे उघडकीस आली आहे. मासिक वेतनात वाढ होत नसल्यामुळे दोन लाख अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या असून मानधनवाढ होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या कृती समितीने घेतला आहे.

राज्यातील ९७ हजार अंगणवाडय़ांमध्ये दोन लाख कर्मचारी काम करत असून त्यांना पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. तर साहाय्यक व मदतनीसाला अनुक्रमे ३२५० रुपये व अडीच हजार रुपये दिले जातात. या अंगणवाडी सेविकांमध्ये ३० वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या साडेआठ हजार सेविका आहेत, तर १५ ते २५ वर्षे काम करणाऱ्यांची संख्या सुमारे ४५ हजार एवढी आहे. त्यामुळे आपल्याला सेवाज्येष्ठतेनुसार आठ ते चौदा हजार रुपये मानधन देण्यात यावे, मागणी करण्यात येत आहे