२०१९ साली मिळणार ७३ सुट्ट्या

मुंबई – नोकरदारांसाठी तसेच सुट्यांच्या प्रतीक्षेत असेल्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. २०१९ मध्ये रविवारसह तब्ब्ल एकूण ७३ सुट्यां मिळणार आहेत.२०१९ मध्ये तीन सुट्या वगळता २१ सुट्या इतर वारी येणार असून, या वर्षी एकूण ७३ सुट्ट्या आल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लक्ष्मीपूजन आणि ईद-ए मिलाद या तीन सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात रविवारला जोडून शनिवार किंवा सोमवारी येणाऱ्या सुट्यांची संख्या अनुक्रमे पाच आणि चार आहे. तर दुसरा किंवा चौथा शनिवार, नंतर रविवार आणि सोमवारचीही सुटी असा वीकेण्ड प्लान करण्याची संधी नोकरदारांना एकदा मिळणार आहे.