आदिनाथच्या ७०० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, २० पेक्षा अधिक महिन्यांचा पगारच नाही

करमाळा – करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गेल्या २० पेक्षा अधिक महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. काही वर्षांपासून हा कारखाना अडचणीत आला असून कारखान्यात असलेल्या जवळजवळ ७०० कामगारांवर गेल्या जवळजवळ २० पेक्षा जास्त महिन्यांपासून पगार न झाल्याने असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे..

आदिनाथचा इतिहास पाहिला तर १९७१ साली भूमीपूजन झाले होते, तब्बल २२ वर्षांनंतर पहिला गळीत हंगाम १९९२ साली झाला. ऐकेकाळी आदिनाथ कारखाना सोलापूर जिल्ह्यात सर्वांत जास्त गाळप करणारा कारखाना म्हणून ओळखला जायचा परंतु कालंतराने या कारखान्याचे वाईट दिवस आले.

गेल्या २० पेक्षा जास्त महिन्यांचा पगार न झाल्याने आदिनाथ कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या घरातील स्रीयांना उजनी पाणलोट क्षेत्रात असलेल्या वांगी, शेटफळ, चिखलठाण, भिवरवाडी, ढोकरी,कंदर आदी गावांमधील शेतात मजुरी ने कामाला जावे लागत आहे. पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण झालेला आहे.

सध्या आदिनाथ मध्ये बागल गटाची एक हाती सत्ता असून कारखान्याच्या विरोधात आवाज उठविला तर कारखान्यातून निलंबित करतील अशी भिती त्यांनी व्यक्त केली. यामुळे आदिनाथ कारखान्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता बहुतांश कर्मचारी याबाबत प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याचं समोर आलं आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापणार

सादिम्यान… एक अवलिया