‘विरोधी पक्षातले अजून ७० आमदार भाजपात येण्यास इच्छुक’

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका तोंडावर येताच अनेक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये पक्षांतर केले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात निवडणुकी आधीच विरोधकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अजून एक सूचक विधान केल आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे किमान 70 आमदार अजुनही भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत असं महाजन यांनी स्पष्ट केल आहे.

गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे विरोधकांना चांगलीच धडकी भरणार आहे. कारण याआधी ही गिरीश महाजन यांनी अनेक नेते संपर्कात असल्याच वक्तव्य केल होत. त्यानंतर भाजपात मोठ्या प्रमाणावर आयात झाली होती. महाजन म्हणाले की, तिकिटासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. आम्ही सर्व्हेनुसार अंतीम निर्णय घेतो. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी पवारांना अंत:करणात ठेवा आणि भाजपमध्ये या असं महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक आजी-माजी आमदार आणि खासदारांनी भाजप शिवसेनेत प्रवेश केल्याने राज्यातलं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत. या सर्व पक्षांतराच्या खेळामध्ये गिरीश महाजन यांनी मोठी भूमिका बजावली. त्यामुळे गिरीश महाजन यांचे हे विधान आता कोणाला भाजपात घेऊन जातय, असा सवाल उपिस्थित झाला आहे.