Chhota Rajan – बनावट पासपोर्ट प्रकरणबनावट पासपोर्ट प्रकरणी छोटा राजनला सात वर्षांचा तुरुंगवास

बनावट पासपोर्ट प्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजनसह तीन जणांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं कालच छोटा राजनसह तीन जणांना दोषी ठरवलं होतं. सप्टेंबर २००३ मध्ये मोहन कुमार नावावर बनलेल्या बनावट पासपोर्ट आणि टूरिस्ट व्हिसावर छोटा राजननं भारतातून ऑस्ट्रेलियात पळ काढला होता.

ऑक्टोबर 2015 मध्ये जेव्हा छोटा राजन ऑस्ट्रेलियाहून इंडोनेशियाला पोहोचला, तेव्हा इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. इंडोनेशियन पोलिसांनी त्याला बालीमध्ये अटक केली. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये त्याला भारताकडे सोपवल