ऑक्सिजन अभावी ७ जणांचा मृत्यू, ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील घटनेच्या चौकशीची मागणी

corona

मुंबई : जोगेश्वरी येथील पालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलमध्ये शनिवारी मध्यरात्री तांत्रिक बिघाडामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे दीड तासात तब्बल सात रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे धक्कादायक वृत्त आहे. हा भयंकर प्रकार घडला तेव्हा हॉस्पिटलमध्ये एकही तज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता केली जात आहे.

मुंबईसाठी ही सर्वांत लाजीरवाणी गोष्ट असून आठ दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या अधिक्षकांनी गॅस पाईप लाईनची दुरुस्ती करणाऱ्या तांत्रिक कामगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. परंतु त्यामुळे या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ट्रॉमा केअर रुग्णालयातील या घटनेची स्वतंत्र चौकशी करतानाच मुंबईतील केईएम, शीव, नायर तसेच कांदिवलीतील शताब्दी आदी रुग्णालयांमधूनही अशाचप्रकारे तक्रार येत असल्याने तेथील आयसीयूतील मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याची मागणी महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केले आहे.

दरम्यान, काल मुंबईतील जीएसएमसीचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण वैदकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि मुलगी श्रद्धा असा परिवार आहे.

डॉक्टर भावे हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. मटाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी रहेजा हॉस्पिटलमध्ये एका अत्यावस्थ असलेल्या कोरोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. पण नंतर त्यांनाच कोरोनाची लागण झाली.

विशेष म्हणजे ते स्वत:च गाडी चालवत रहेजामध्ये उपचारासाठी दाखल झाले. पण कोरोनाच्या महामारीत सगळ्यांसाठी झटणाऱ्या या डॉक्टरांना बेड मिळण्यासाठी तब्बल 10 तास वाट पाहावी लागली.

‘लॉकडाऊन’मुळे पुण्यात पार पडलं अनोखं लग्न; पुणे पोलिसांनी केलं कन्यादान

‘मीदेखील माजी मुख्यमंत्री आहे, मी काय काल राजकारणात आलेलो नाही’

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केजरीवाल सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय