पूरग्रस्तांना 7 कोटी 14 लाख 95 हजार रुपयांचं झालं वाटप, विभागीय आयुक्तांचा दावा

टीम महाराष्ट्र देशा- पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाना प्रत्येकी 5 हजार प्रमाणे, 7 कोटी 14 लाख 95 हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 22 हजार 962 कुटुंबाना 2 हजार 296 क्विंन्टल गहू आणि तांदूळ तसंच 10 हजार 251 लिटर केरोसीन चं वाटप करण्यात आलं असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात 350 ग्रामीण भागातल्या कुटुंबाना 17 लाख 50 हजार रुपये,सातारा जिल्ह्यातल्या 566 ग्रामीण कुटुंबाना 28 लाख 30 हजार तर सोलापूर जिल्ह्यातल्या 398 ग्रामीण भागातल्या कुटुंबाना 99 लाख 90 हजार रुपयांचं वाटप करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, पुणे विभागात पुरामुळे 5 जिल्ह्यात मिळून 51 जण मृत्युमुखी पडले असून 4 व्यक्ति बेपत्ता आहेत. पशुधनाचही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

राज्यात कोल्हापूर आणि सांगली मधली पूरस्थिती आता हळूहळू सुधारत आहे. आत्तापर्यंत 6 लाख 45 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. सांगलीमध्ये इर्विन पुलाखाली पाण्याची पातळी धोक्याच्या खुणेच्या खाली गेली आहे. दोन्ही जिल्ह्यातल्या या पूरस्थितीमुळे महावितरणचं 873 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

महत्वाच्या बातम्या