…ते सिनेमे सलमानने नाकरले आणि ‘तो’ ठरला ‘बाजीगर’

अभिनेता सलमान खान येत्या 27 डिसेंबरला 52 वर्षे पूर्ण करणार आहे.

मुंबईः  बॉलिवूडच्या या ‘दबंग’ने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मात्र त्याने अशा काही सिनेमांना नकार दिला, ज्यांनी बॉलिवूडमध्ये यशाचे अनेक रेकॉर्ड मोडित काढले. सलमानने नाकारलेले सिनेमे शाहरुख आणि आमिरच्या वाट्याला आले आणि ते या सिनेमांमुळे स्टार बनले.

सलमानने नाकारला होता ‘बाजीगर’…
सलमानने नाकारलेले अधिकाधिक सिनेमे शाहरुखने स्वीकारले. यापैकीच एक सिनेमा म्हणजे अब्बास-मस्तान यांचा ‘बाजीगर’. या थ्रिलर सिनेमातील नकारात्मक भूमिकेमुळे सलमानने याला नकार दिला होता. नंतर ही खलनायकाची भूमिका शाहरुखला ऑफर झाली आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला.

bollywood-movies-rejected-by-salman-khan-baazigarदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995)-  यशराज बॅनरच्या 1995 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमासाठी निर्माता-दिग्दर्शकांची पहिली पसंती शाहरुखला नव्हे सलमान खानला होता. मात्र काही कारणास्तव सलमानने हा सिनेमा नाकारला. नंतर ही भूमिका शाहरुख खानला ऑफर करण्यात आली. या रोमँटिक ड्रामा सिनेमाने यशाचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले होते.

bollywood-movies-rejected-by-salman-khan-dilwale-dulhaniya-le-jayengeचक दे इंडिया (2007)-  यशराज बॅनर आणि शिमित अमीर दिग्दर्शित ‘चक दे इंडिया’ या सिनेमातील हॉकी कोच कबीर खानची भूमिका सर्वप्रथम सलमान खानला ऑफर करण्यात आली होती. मात्र तारखांची अडचण असल्यामुळे सलमान हा सिनेमा स्वीकारु शकला नव्हता. नंतर ही भूमिका शाहरुख खानने स्वीकारली. या भूमिकेने शाहरुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला होता.bollywood-movies-rejected-by-salman-khan-dilwale-dulhaniya-le-jayenge

जोश (2000)- मन्सूर खान यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या अॅक्शन क्राइम धाटणीच्या ‘जोश’ या सिनेमातील मॅक्सची भूमिकासुद्धा सुरुवातीला सलमानकडे आली होती. बातम्यांनुसार, सलमानला ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारायची नव्हती. म्हणून त्याने हा सिनेमा नाकारला होता. नंतर ही भूमिका शाहरुखकडे आली आणि हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.bollywood-movies-rejected-by-salman-khan-josh

कल हो न हो (2003)- धर्मा प्रॉडक्शन बॅनरच्या या रोमँटिक सिनेमात सैफ अली खानने साकारलेली भूमिका सुरुवातीला सलमान खान करणार होता. मात्र शाहरुख आणि सलमान यांच्यात एकेकाळी असलेल्या कोल्ड वॉरमुळे त्याने ही भूमिका नाकारली होती. हा सिनेमासुद्धा ब्लॉकबस्टर ठरला होता.

bollywood-movies-rejected-by-salman-khan-kal ho na ho

गजनी (2008)-  अमीर खान ने साकारलेल्या संजय सिंघानिया ची भूमिका अगोदर सालमन खान साकारणार होता.

bollywood-movies-rejected-by-salman-khan-ghajni