मुंबई : महाराष्ट्रात आज 6,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 979 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 22 हजार 485 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. राज्यात आज 167 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 64,46, 360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,51, 810 (13.46 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,52,702 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,653व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबई पालिका क्षेत्रामध्ये सध्या ५ हजार ७७९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत तर मागील २४ तासात एकूण ३७४ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोना परिस्थितीती आटोक्यात आली असल्याचे दिसतं आहे. मुंबईत मागील १४ तासात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या असलेली कोरोनाची परिस्थिती कायम राहिली तर मुंबईतील कोरोना हद्दपार करण्यास यश मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष ; NDRF,हवाईदलाचे ४ हेलिकॉप्टर्स, लष्करही दाखल
- आयपीएलसाठी सीएसके आणि दिल्ली संघ ‘या’ तारखेला दुबईला रवाना
- मुंबई गुन्हे शाखेचे पथक राज कुंद्राला घेवून पोहचले थेट शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर
- मुख्यमंत्र्यांचा निर्णय; दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत
- दहावीनंतर आता प्रतिक्षा बारावीच्या निकालाची, औरंगाबाद विभागातील ४२ टक्के काम पूर्ण!