मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात ते आपल्या गाण्यांमुळे त्याचबरोबर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देखील सध्या अमृता फडणवीस यांचं ‘तिला जगू द्या’ हे गाणं व्हायरल होत आहे त्याचबरोबर या गाण्यानंतर या अनेकांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
भाऊबीजेनिमित्त पोस्ट केलेल्या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाल्याचे सांगत आपण पुन्हा नवीन कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ असं म्हटलं आहे. अमृता यांनी स्त्रियांना समर्पित केलेल्या या गाण्यामध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे. मात्र एकीकडे अमृता यांनी या गाण्याला पसंती मिळत असल्याचं म्हटलेलं आहे.
हे एका बाजूला सुरु असतानाच या गाण्याची निर्मिती करणाऱ्या टी-सिरीजच्या युट्यूब चॅनेलवर या गाण्याला लाईकपेक्षा डिस्लाइक जास्त आहेत. अमृता फडणवीस यांचं हे नवीन गाणे लोकांना फारसं आवडलं नाही. यूट्यूबवर रिलीज झालेल्या गाण्याला लाइक्सपेक्षा जास्त लोकांनी डिसलाइक्सच दिले आहेत. नेटकरी लोकांनी तब्बल ६७ हजार डिसलाइक्स दिले आहेत. याशिवाय अनेक नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दरम्यान, १६ लाख लोकांनी हे गाणे पहिले देखील आहे.ज्या पद्धतीने डिसलाइक्स वाढत आहेत त्यामुळे एका नवा विक्रम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान,असं असलं तरी मंत्री यशोमती ठाकूर यांनी गाण्याचा आशय चांगला असल्याचं म्हणत त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.“सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल होत आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. माझ्या शुभेच्छा,” असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांचं गाणं शेअर करत कौतुक केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता प्रसिद्ध कॉमेडियन भरती सिंह आणि पती हर्ष ‘एनसीबी’च्या रडारवर
- शिर्डी नगरपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कटिबद्ध व्हा- राधाकृष्ण विखेंचे कार्यकर्त्यांना आदेश!
- ‘फ्युज उडालेल्या सरकारकडून गोरगरीब वीज ग्राहकांना काहीच मिळणार नाही’
- ‘रेमेडिसविर’ औषध कोरोनावर गुणकारी नाही ; WHO ने केले औषधांच्या यादीतून बाद
- अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या निर्मात्याला आरोह वेलणकरने झापलं