लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणार ?

corona

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा रविवारी ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन वाढवणार का? किंवा यात काही शिथिलता आणून सूट देण्यात येईल यावर चर्चा सुरु आहे.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मेंदूशास्त्र संस्थेने Nimhans एक धक्कादायक नाहीती दिली आहे. ‘लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल. यानंतर भारतात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात होईल,’ असं त्यात म्हंटलं आहे.

तसेच यंदाच्या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील ६७ कोटी लोकांना कोरोना व्हायरसची कोरोनाची लागण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. चिंतेची बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांमध्ये ७,९६४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार ७६३ झाली आहे. २४ तासांत तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक म्हणजे देशात आतापर्यंत ८२ हजार ३७० जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे देशात सध्या ८६ हजार ४२२ जणांवर उपचार सुरू आहेत. तर चिंतेची बाब म्हणजे देशात आतापर्यंत ४९७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुढे शहरात देखील कोरोना चा प्रसार वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहर आणि जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 302 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 186 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.