भगवंत ब्रिगेड आयोजित नोकरी महोत्सवात ६५३ बेरोजगारांना मिळाला रोजगार

सोलापूर : तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी भगवंत ब्रिगेडने आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात रविवारी सायंकाळी ६५३ बेरोजगार तरुणांना नोकरीचे नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. सुलाखे हायस्कूल येथे शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, तर रविवारी निवड प्रक्रिया झाली. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, भाजप नेते राजेंद्र मिरगणे, उद्योजक रामभाऊ जगदाळे, पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावाले, अमित रसाळ, श्रीराम सातपुते, अनंत कवठाळे, दिपक आंधळकर आदी उपस्थित होते.

भाऊसाहेब आंधळकर व राजेंद्र मिरगणे यांनी भगवंत ब्रिगेड या अराजकीय व्यासपीठाची उभारणी करून आयोजित केलेला हा पहिलाच उपक्रम होता. ४० कंपन्यांनी या नौकरी महोत्सवात हजेरी लावली. यात इयत्ता पाचवी ते उच्च शिक्षण घेतलेल्या बार्शी परिसरातील सुमारे दोन हजार तरुणांनी सहभाग नोंदवला. तर भगवंत ब्रिगेडच्या वतीने ५५ मूकबधीर मुलांना पुण्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.