परभणीच्या पाणी प्रश्नासाठी ६५० कोटींचा आराखडा

परभणी: जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा नादुरुस्त असल्यामुळे या कालव्यातून पाण्याचे वहन पूर्ण क्षमतेने होत नसल्यामुळे परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे ही पाण्यापासून वंचित असल्याने या कालव्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी आ. राहुल पाटील यांनी केली आहे. आ. पाटील यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या कामाची मागणी केली आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील ९७ हजार हेक्टर लाभक्षेत्र आहे. परंतू हा कालवा नादुरूस्त असल्यामुळे पाण्याचे वहन पुर्ण क्षमतेने होत नाही. विशेषतः यात परभणी विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के गावे ही सिंचनापासून वंचित राहत आहे. त्यावर जलसंपदा मंत्र्यांनी दुरूस्तीसाठी 650 कोटींचा आराखडा तयार करू व वेळप्रसंगी जागतीक बँकेकडून कर्ज घेवून हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल असे आश्‍वासन दिले.

येथील अनेक गावांना पाणी मिळत नाही त्यामुळे शेतकरी सिंचनासाठी पाण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याच्या बाबीकडे आ. राहुल पाटील यांनी लक्ष वेधले. तसेच कालव्याची दुरुस्ती करण्याबाबत बैठक घेण्यात यावी, अशी मागणी देखील या वेळी आ. राहुल पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP