Share

MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत विविध पदांसाठी 65 जागा

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्या मार्फत सामान्य राज्यसेवेच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी तब्बल 65 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

MPSC यांच्यामार्फत विविध पदांच्या 65 जागा

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MSPC यांच्या मार्फत सामान्य राज्यसेवेच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी 65 जागा भरण्यासाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. nmk.co.in या अधिकृत वेबसाईटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, MPSC च्या भरती प्रक्रियामध्ये अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) पदाच्या जागा इत्यादी पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

MPSC यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख

MPSC मार्फत राबवण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी 25 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now