बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मिळणार 64 कोटी रुपये

औरंगाबाद : औरंगाबादेत होणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 64 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी महापौर नंदकुमार घोडेले व शिष्टमंडळाने मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर हा निधी महापालिकेला वितरित करण्याचे आदेश नगर विकास खात्याला तत्काळ दिले जातील, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.

औरंगाबादेत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्यात येत आहे. या स्मारकासाठी शिवसेनेतर्फे सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. भाजप सरकार असताना पासून महापौर नंदकुमार घोडेले यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. आता सेनेचे सरकार असल्यामुळे या स्मारकास गती मिळणार आहे.

Loading...

संत एकनाथ रंगमंदिरासाठी जिल्हा विकास योजनेतून आठ कोटी रुपये महापालिकेला देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामासाठीच्या 267 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली असता, दोन दिवसांत नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांबरोबर बैठक घेतली जाईल. या बैठकीत रस्त्यांच्या प्रस्तावाबद्दल निर्णय घेण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी