२२ वर्षानंतर पतीला घटस्फोट मंजूर

court १

मुंबई : मूल होत नसल्याने वारंवार पतीला दोष देणा-या पत्नीपासून अखेर एका ६२ वर्षीय व्यक्तीला घटस्फोट मिळाला आहे. वारंवार पतीला त्रास देणे हा प्रकार छळ करणे व्याख्येत मोडत असल्याचे यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.

याप्रकरणी न्या. के. के. तातेड व न्या. एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. या व्यक्तीचा २२ वर्षांपासून त्यांचा घटस्फोटासाठी न्यायालयीन लढा सुरू होता. या जोडप्याचे १९७२मध्ये लग्न झाले होते. मात्र, मूल न होऊ शकल्याने पत्नी वारंवार पतीला दोष देत होती. दोघे १९९३ पासून विभक्त राहत होते. कुटुंब न्यायालयापुढे झालेल्या साक्षीत पत्नीने मूल होऊ न शकल्याबद्दल पतीला दोष दिल्याचे निदर्शनाला आले. त्यावरून हा प्रकार छळ असल्याचाच असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.