आता केवळ एक ते दोन जणच बाहेर शौचाला जातात हे आमचं यश – पंकजा मुंडे

pankaja munde

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने हागणदारीमुक्त महाराष्ट्र झाल्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याची टीका या घोषणेवर करण्यात आली. पण, ”हागणदारीमुक्त महाराष्ट्र याचा अर्थ आपण शब्दशः घेत आहोत. पूर्वी गावातील 500 लोक बाहेर शौचाला जात होते, आता केवळ एक ते दोन जण जातात हे यश आहे,” असं वक्तव्य ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केल आहे.

”बाहेर जाणारे लोक आढळणार नाहीत असं नाही. मात्र पूर्वी 40 टक्केच शौचालये होती, आम्ही उर्वरित 60 टक्के बांधली. जी शौचालये बांधली ती वापरली जात नाहीत त्याबाबत बीडीओंना सूचना दिल्या जातील,” असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

राज्यात 60 हजार शौचालये बांधायची आहेत. 2019 च्या शेवटपर्यंत बेसलाईन सर्व्हेनुसार जेवढी शौचालये बांधायची आहेत, तेवढी शौचालये राज्याने 2018 मध्येच बांधली आहेत, असा दावाही पंकजा मुंडे यांनी केला.