नाशिकच्या धरणात 60 टक्के पाणी शिल्लक

नाशिक  : गत दोन वर्षांपूर्वी जिल्हयातील धरणांमध्ये जेमतेम पाण्याचा साठा असताना पाण्याची सातत्याने होणारी मागणी व त्याचा पुरठा करण्यात दमछाक झालेल्या जिल्हा प्रशासनाला यंदा धरणांची स्थिती पाहून काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यंदाच्यावर्षी सरासरी 102 टक्के पावसाची नोंद झाल्याने आजमितीस धरणांमध्ये 60 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. काही तालुक्यांमधून टंचाई जाणवू लागल्याने टँकरची मागणी होत आहे. मात्र वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत. जिल्हयातील 7 मोठे व 17 लहान अशा 24 प्रकल्पांची साठवण क्षमता 65814 दलघफु असून आजमितीस या प्रकल्पात 39 हजार 390 दलघफु म्हणजेच साठवण क्षमतेच्या 60 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. नाशिक शहराची तृष्णा भागवणारे गंगापूर धरण समुहात 75 टक्के पाणी साठा आहे.

या धरणात नाशिक महापालिका, औद्योगिक वसाहत, एकलहरे वीज केंद्र, डाव्या कालव्यावर 16 गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे तसेच धरण पुर्ण क्षमतेने भरल्यास शेतीसाठीही तीन आवर्तने दिली जातात यंदा या सर्वांसाठी सुमारे 5 हजार दलघफु आरक्षण करण्यात आले असून नाशिककरांना पिण्यासाठी 3900 दलघफु आरक्षण गंगापूर धरणातून करण्यात आले आहे. ओझरखेड, धरण समुहात पुणेगाव, तीसगाव या तीन मध्यम धरणांचा सामावेश आहे. या धरणांमध्ये सध्या 2181 दलघफु म्हणजेच 68 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी 1849 दलघफु इतका जलसाठा शिल्लक होता. निफाड आणि दिंडोरी या तालुक्यांसाठी या समुहातून पाणी सोडण्यात येते. याकरीता 14 आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत. त्यात पिण्याचे व सिंचनासाठीचे आरक्षण आहे. विशेष म्हणजे दोन्ही तालुक्यात द्राक्ष लागवडीचे क्षेत्र मोठे असून बाग छाटणीनंतर सिंचनासाठी पाण्याची गरज असते यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. गंगापूर धरण सुमहात मोडणारया आळंदी या मध्यम स्वरूपातील धरणाची क्षमता 970 दलघफु असून सध्या त्यात गतवर्षीच्या तुलनेत 24 टक्के अधिक जलसाठा आहे. गतवर्षी अवघा 54 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आळंदीचे पाणी गंगापूर धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्यामार्गे सिंचनासाठी आरक्षित करण्यात आले आहे. गिरणा खो-यातील धरणप्रकल्पात 40 टक्केपाणीसाठा आहे. यात चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या व गिरणा यातील चणकापूर आणि गिरणा हे माठे धरण आहे. उर्वरित तीन मध्यम स्वरूपाचे धरण असल्याने गिरणा धरणातील पाणी हे जळगावसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

तर चणकापूर, हरणबारी, केळझर या तील धरणांतून कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव व चांदवड या तालुक्यांसाठी पिण्याचे व सिंचनाचे आरक्षण करण्यात आले आहे. तसेच मार्च ते मे दरम्यान टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येते. दारणा व नांदूरमध्यमेश्वरमधून निघणारया गोदावरी डावा व उजवा अशा दोन कालव्यांवर नाशिक, सिन्नर, राहता, कोपरगावं, या तालुक्यातील औद्योगिक वसाहतींच्या योजना, तसेच निफाड, येवला, कोपरगाव, वैजापूर या तालुक्यातील शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टँकरची मागणी यंदा समाधानकारक पाउस होवूनही येवला, बागलाण, मालेगाव तालुक्यातून टँकरची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्यातही साधारणपणे अशीच काहीशी परिस्थिती आहे.

मात्र जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हयात कामे करण्यात येत असल्याने या योजनेचे बिंग फुटु नये याकरीता प्रशासनाकडून टँकर मंजूर करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्तरब्बी हंगामातील 50 पैशांपेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेल्या गावांसाठी रब्बी हंगामातील पैसेवारी जाहीर केली. नाशिक जिल्हयातील 1 हजार 18 गावातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहेLoading…
Loading...