वय अवघे ६ वर्षे.. वार्षिक कमाई ७१ कोटी

ryan toy

टीम महाराष्ट्र देशा: आपल्याकडे ६ वर्ष्याच्या पुढील मुलांनाच शाळेत प्रवेश मिळतो. मग त्याच्यापुढे १० वी, १२ वी, पदवी असा एक एक टप्पापार करत पुढे जाऊन नौकरी मिळते. काहीजण स्वत:चा व्यवसाय करतात. मात्र आपण कधी विचार केलाय कि एवढ्या वर्षात कमाईच्या दृष्टीने आपण काय केल?. तर नक्कीच अनेकांचं उत्तर ‘काहीच नाही’ हेच असणार. अशातही कोणी आपल्याला सांगितले कि एक मुलगा आहे जो वर्षाला तब्बल ७१ कोटी रुपये कमाई करतो. नक्कीच तो कोणी तरी बडे ‘बाप कि औलाद’ असणार हेच वाटेल. मात्र थांबा तुम्ही कुठेतरी चुकत आहात.

रायन वय वर्षे अवघे ६ मात्र वार्षिक कमाई तब्बल ७१ कोटी. रायनने हि सर्व कमाई केली आहे ती त्याच्या युट्युब चॅनलमधून. या पठ्याने कमाईच्या बाबतीत असा हाहाकार माजवल आहे, कि बड्याबड्या धुरंधरांनी देखील हे सर्व बघून तोंडात बोटे घातली आहेत. फोर्ब्स मैगजीननुसार रायन हा युट्युबवर कमाईच्या बाबतीत जगात आठव्या नंबरवर आहे. १ जून २०१६ ते १ जून २०१७ या एक वर्ष्याच्या दरम्यान त्याने तब्बल ७१ कोटींची तुफान कमाई केलीय.

जुलै २०१५ मध्ये रायनच्या आई वडिलांनी त्याचा एक व्हिडीओ शूट करून युट्युबवर टाकला. हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाल कि आजवर 800 मिलियन लोकांनी तो पहिला आहे. Ryan Toys Review नावाने हा युट्युब चॅनल चालवला जातो.

या चॅनलवर रायन लहान मुलांच्या खेळण्यांचे review देतो. जे review जगभरातील लहान मुलांसह त्यांच्या पालकांकडून बघितले जातात. एकूणच हे सर्व वाचल्यानंतर आता आपण फुकटच एवढे दिवस वाया घालवले का हा प्रश्न नक्कीच पडणार आहे. तर मग आता ‘पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे होगे खराब’ म्हणणाऱ्या लोकांचे दिवस गेले आहेत. कारण ‘खेळण्या’मधूनच नाव प्रसिद्धी आणि पैसही मिळतोय.