पुणे – नगर महामार्गावर भीषण अपघातात 7 ठार

पुणे- पुणे- अहमदनगर महामार्गावर लोणीकंद येथे  टेम्पो ट्रव्हलर बस  तसेच  पाण्याचा टॅकर आणि चारचाकीच्या विचित्र अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नगर हमरस्त्यावर लोणीकंद  (ता हवेली जि पुणे ) गावाजवळ टेम्पो ट्रव्हलर बस आणि पाण्याचा टॅकर यांची समोरासमोर धडक झाली यामध्ये 7 जण ठार झाले आहेत. सायंकाळी 7.30 वाजता  हा अपघात झाला असून बस पुण्याकडे येत होती तर टॅकर विरुद्ध दिशेने येत होता,  बसच्या पाठीमागे असलेली एक मोटारही अपघातग्रस्त झाली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच जखमींवर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.