जुलै-ऑगस्टपासून महिन्याला ६ कोटी कोव्हॅक्सिनचे उत्पादन

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर ताण येऊन त्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र सध्या देशभरात आहे. ऑक्सिजन आणि बेड्सची कमी असल्याचे काही दिवसापूर्वी पहायला मिळत होते. करोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणाचा पर्याय सध्या समोर आहे. अशातच देशात मोठ्या प्रमाणावर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून लस पुरवठा होत नसल्याचा आरोप अनेक राज्यांनी केला आहे. लसीच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, देशात मे-जूनदरम्यान कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनचे उत्पादन दुप्पट होईल. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. जुलै ते ऑगस्ट या काळात याच लसीची उत्पादन क्षमता सहा-सात पट अधिक होईल, असा दावाही मंत्रालयाने केला आहे.

एप्रिलपर्यंत दर महिन्याला कोव्हॅक्सिनचे १ कोटी डोस तयार केले जात होते. जुलै-ऑगस्टपासून महिन्याला सात ते आठ कोटी डोस तयार होतील. सप्टेंबरपर्यंत महिन्याला दहा कोटी डोस निर्मितीची क्षमता गाठू, अशी आशाही मंत्रालयाने व्यक्त केली आहे. भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे उत्पादन करत आहे. यात हाफकिन (मुंबई), इंडियन इम्युनॉलॉजिकल्स (हैदराबाद) आणि भारत इम्युनॉलॉजिकल्स (बुलंदशहर) या कंपन्या मदत करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP